मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी खदानीतील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; टेन गावात हळहळ

खदानीतील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; टेन गावात हळहळ

पालघर : तालुक्यातील टेन येथे शुक्रवारी (दि. 27 फेब्रुवारी 2026) सायंकाळी सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाणी भरलेल्या खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कु. जिग्नेश पवार (वय 8 वर्षे) व कु. आयुष पवार (वय 15 वर्षे) हे दोघे पोहण्यासाठी नदीलगत असलेल्या पाणी साचलेल्या खदानीत गेले होते. पोहत असताना दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले मूळची मध्य प्रदेश येथील असून सध्या टेन परिसरात वास्तव्यास होती. ते कुटुंबासह येथे राहून प्लास्टिक गोळा करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली असता कु. जिग्नेश पवार याचा मृतदेह घटनास्थळावरून मिळून आला. त्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय मनोर येथे पाठविण्यात आले.

दरम्यान, कु. आयुष पवार याचा मृतदेह शोधण्यासाठी बचावकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी (दि. 1 मार्च 2026) सायंकाळी सुमारे 5.00 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पालघर यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह बाहेर काढला.


या दुर्दैवी घटनेमुळे टेन परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी खदानी परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने