मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बोईसरमध्ये ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’चा अनोखा आध्यात्मिक-सांस्कृतिक संगम

बोईसरमध्ये ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’चा अनोखा आध्यात्मिक-सांस्कृतिक संगम

बोईसर : प्रतिनिधी
औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोईसरमध्ये आता अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा रंगोत्सव अनुभवायला मिळणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता विराज इंटरनॅशनल स्कूल (ऑडिटोरियम), बोईसर येथे ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल – कलर्स ऑफ द लाईट विथिन’ हा भव्य आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, नागरिकांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे.

‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’ ही केवळ कला सादरीकरणाची मैफल नसून संगीत, नृत्य, ध्यान आणि आध्यात्मिक चिंतन यांचा संगम असलेली एक चिंतनयात्रा आहे. कार्यक्रम इंग्रजी आणि हिंदी भाषेत सादर केला जाणार असून, आत्मशांती व सकारात्मक ऊर्जा जागविण्याचा संदेश यामधून दिला जाणार आहे.

या कार्यक्रमात रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील ‘डिवाईन लाईट आर्ट अँड कल्चर ग्रुप’चे कलाकार सहभाग घेणार आहेत. सुप्रसिद्ध रशियन गायक अल्बर्ट असादुल्लिन आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शिका अ‍ॅना पुसतोवोइत यांचे आकर्षक नृत्य सादरीकरण कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे. तसेच ब्रह्माकुमारी संस्थेचे आध्यात्मिक मार्गदर्शक बी.के. संतोष यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना आत्मचिंतनाचा संदेश दिला जाणार आहे.


औद्योगिक जीवनाच्या धकाधकीत मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शोधणाऱ्या नागरिकांसाठी हा कार्यक्रम एक सकारात्मक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कला आणि अध्यात्म यांचा सेतू बांधत ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’ हा कार्यक्रम बोईसरकरांसाठी संस्मरणीय ठरण्याची चिन्हे आहेत.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने