मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पुणे जिल्हा, हवेली तालुक्यासाठी “जागरूक आवाज”चे तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

पुणे जिल्हा, हवेली तालुक्यासाठी “जागरूक आवाज”चे तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

 पुणे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद सरवदे 

पुणे : समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या जागरूक आवाज – प्रेस डिजिटल मीडिया या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात पत्रकारितेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.


हवेली तालुक्यातील सासवड रोड, पापडे वस्ती येथील मा. गणेश सुरेश खरात


पुणे जिल्हा, हवेली तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 26 जानेवारी 2026 पासून लागू होणार असल्याची माहिती “जागरूक आवाज”चे मुख्य संपादक आशितोष श्रीधर गावंडे यांनी नियुक्तीपत्राद्वारे दिली आहे.


पत्रकारिता, सामाजिक प्रश्न, प्रशासनाशी संबंधित बाबी तसेच जनतेच्या समस्यांवर प्रकाश टाकत संवैधानिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. हवेली तालुक्यातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न आणि सामाजिक विषय प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


संविधानाच्या चौकटीत राहून निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता करणे, सत्य आणि पारदर्शकतेला प्राधान्य देणे तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेचा आवाज ठामपणे मांडणे, अशी अपेक्षा संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या नियुक्तीमुळे हवेली तालुक्यात “जागरूक आवाज”च्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने