मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी हेवेली तालुक्यात ‘जागरूक आवाज’चे नवे प्रतिनिधी – ओंकार पांचाळ यांची नियुक्ती

हेवेली तालुक्यात ‘जागरूक आवाज’चे नवे प्रतिनिधी – ओंकार पांचाळ यांची नियुक्ती

 पुणे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद सरवदे 

पुणे : समाजातील प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या “जागरूक आवाज – प्रेस डिजिटल मीडिया” या माध्यमाने आपली संघटनात्मक ताकद अधिक बळकट करत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यासाठी ओंकार पांचाळ यांची तालुका प्रतिनिधी म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.


सामाजिक जाणीव, संघटन कौशल्य आणि जनहितासाठी काम करण्याची तयारी या गुणांच्या आधारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 26 जानेवारी 2026 पासून त्यांची नियुक्ती लागू होणार असून, पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न, प्रशासनाशी संबंधित मुद्दे आणि नागरिकांच्या समस्या यांना प्रभावीपणे पुढे आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या पार्श्वभूमीवर ‘जागरूक आवाज’च्या माध्यमातून हवेली तालुक्यातील प्रश्नांना न्याय देण्याचे काम ओंकार पांचाळ यांच्याकडून अपेक्षित आहे. सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान देत पत्रकारिता करण्याचा संदेश या नियुक्तीद्वारे पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे.

हेवेली तालुक्यात ‘जागरूक आवाज’चे नवे प्रतिनिधी – ओंकार पांचाळ यांची नियुक्ती

मुख्य संपादक   आशितोष श्रीधर गावंडे


यांनी या नियुक्तीबाबत विश्वास व्यक्त करताना सांगितले की, जबाबदार पत्रकारिता आणि लोकहितासाठी सातत्याने काम करणाऱ्या प्रतिनिधींमुळेच माध्यमाची विश्वासार्हता टिकून राहते. ओंकार पांचाळ यांच्या कार्यक्षमतेमुळे हवेली तालुक्यातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीद्वारे ‘जागरूक आवाज’ने पुन्हा एकदा समाजाभिमुख पत्रकारितेची आपली बांधिलकी स्पष्ट केली असून, हवेली तालुक्यातील नागरिकांचा आवाज अधिक ताकदीने पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने