मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बोईसरमध्ये महिलांच्या २२ स्टॉलवर कारवाई; आरपीआय आक्रमक

बोईसरमध्ये महिलांच्या २२ स्टॉलवर कारवाई; आरपीआय आक्रमक

  पालघर जिल्हा प्रतिनिधी 


पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे महिला नागरी सेवा सहकारी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिक स्टॉलवर ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी केला आहे. याबाबत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.


आरपीआयचे पालघर जिल्हाध्यक्ष मा. सुरेश डी. जाधव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बेरोजगार मागासवर्गीय महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी संस्थेमार्फत बोईसर ग्रामपंचायतीच्या जागेवर स्टॉल उभारून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला होता.


मात्र, १९ मे २०२६ रोजी ग्रामपंचायतीने कोणतीही नोटीस न देता २२ स्टॉल हटविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सुमारे २२ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच परिसरातील इतर अनधिकृत स्टॉलवर कारवाई न करता केवळ संबंधित संस्थेलाच लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे

.

या प्रकरणात संबंधित महिलांना न्याय मिळवून देऊन त्यांचा रोजगार पुन्हा सुरू करण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी प्रशासनाकडे केली आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने