*पालघर जिल्हा प्रतिनिधी
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील धानिवरी गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १३ व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आज दिनांक २६ मे २०२६ रोजी १० मृत व्यक्तींच्या वारसांना धनादेशाद्वारे मदत रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.
या मदत वितरणाची कार्यवाही डहाणू तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली असून तहसीलदार सुनील कोळी यांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.
तसेच उर्वरित तीन मृत व्यक्तींच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली मदत रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
धानिवरी महामार्गावरील या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदत व समन्वय प्रक्रिया राबवित मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यवाही गतीने पूर्ण केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे संबंधित कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
