मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बोईसरमध्ये भव्य रक्तदान शिबिर; 126 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बोईसरमध्ये भव्य रक्तदान शिबिर; 126 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 पालघर जिल्हा प्रतिनिधी 


बोईसर : सामाजिक बांधिलकी जपत हरिदया फाउंडेशन (रजि.), बोईसर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 126 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे रक्तकर्ण प्राध्यापक किरण थोरात यांनी तब्बल 107व्यांदा रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.


या उपक्रमासाठी एसबीटीसी (पालघर) तसेच पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्त केंद्र, जव्हार यांच्या रक्तपेढ्यांचे सहकार्य लाभले. रक्तदानासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 3000 सीड बॉल्सचे वाटप करण्यात आले. तसेच नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत नागरिकांचे प्रबोधन करून सामाजिक जनजागृती करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी बोईसर रेल्वे स्टेशनचे मुख्यप्रबंधक (स्टेशन सुपरिटेंडंट) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दोन्ही रक्तपेढ्यांच्या स्टाफचे गुलाब पुष्प देऊन आभार मानण्यात आले.


कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पाटील, रवींद्र यादव, मुकेश, योगेश, शिवाजी, शैलेश आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन हरिदया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश हरिनाथ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने