- नामांतर चळवळ ही केवळ नाव बदलण्याची लढाई नव्हती, तर ती दलित स्वाभिमान, अस्मिता आणि हक्कांसाठी दिलेली ऐतिहासिक झुंज होती. या चळवळीत असंख्य दलित कार्यकर्त्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या रक्तावर उभा राहिलेला हा लढा आज राजकीय स्वार्थासाठी विसरला जात असल्याचे चित् दुर्दैवी आहे
दलित समाजात फाटा-फूट निर्माण करून शरद पवारांनी या चळवळीच्या विचारांशी घात केल्याचा आरोप आज जोर धरत आहे. सत्तेच्या राजकारणासाठी दलित ऐक्य कमकुवत करणे म्हणजे नामांतर चळवळीतील शहिदांच्या बलिदानाचा अपमान आहे. समाजाला विभागून सत्ता टिकवण्याचे राजकारण दलितांच्या हिताचे कधीच ठरू शकत नाही.
आज गरज आहे ती इतिहासाची आठवण ठेवण्याची. नामांतर चळवळीतील शहिदांचे रक्त आपल्याला प्रश्न विचारते—आपण त्यांचा लढा पुढे नेत आहोत की त्यांच्या बलिदानावर राजकीय तडजोड करत आहोत? दलित समाजाने सजग होऊन अशा फूट पाडणाऱ्या राजकारणाला ओळखणे आणि नाकारणे हाच त्या शहिदांना खरा अभिवादन ठरेल.
