मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

 औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...


पालघर प्रतिनिधी -


 पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. J-162/163 येथे असलेल्या शिव इंडस्ट्री कंपनीमध्ये आज सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता लक्षात घेता तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून MIDCच्या तीन BRC पैकी एक आणि पालघर नगरपरिषदची एक अशा एकूण पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी औद्योगिक परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बोईसरसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने संबंधित प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनाची जबाबदारी अधोरेखित होते.


औद्योगिक युनिटमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे का, नियमित तपासणी होते का, तसेच आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना केली जाते, याचा सखोल आढावा घेण्याची गरज आहे. केवळ घटना घडल्यानंतर हालचाली करण्यापेक्षा, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अधिक महत्त्वाचे ठरते.



या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून निष्कर्ष जनतेसमोर मांडावेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने