मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी भुलेश्वरच्या आनंद आश्रमचे निळकंठेश्वर महाराज यांची अँजिओप्लास्टी यशस्वी; डॉक्टरांचा सत्कार

भुलेश्वरच्या आनंद आश्रमचे निळकंठेश्वर महाराज यांची अँजिओप्लास्टी यशस्वी; डॉक्टरांचा सत्कार

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद सरवदे 


भुलेश्वर येथील आनंद आश्रमाचे पूज्य निळकंठेश्वर महाराज यांच्यावर वयाच्या ८७ व्या वर्षी करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडली. प्रकृती अत्यंत चिंताजनक असतानाही डॉक्टरांनी वेळेवर व अचूक उपचार करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने त्यांच्या शिष्यवर्गात व भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या भक्तांना दिलासा मिळाला आहे. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि वैद्यकीय कौशल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या यशस्वी उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांचे शिष्य शामकाका खुटवड आणि भाजपचे युवा नेते ऋतुराज खुटवड यांच्या पुढाकाराने यशराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टरांना पेन भेट देऊन त्यांच्या सेवेसाठी आभार व्यक्त करण्यात आले.


या कार्यक्रमास मिलिंद दादा सरवदे, डॉ. हितेश पालवे, गणेश खरात, तेजस टिळे, डॉ. नहार, धनराज पांचाळ, अक्षय गजरमल, गणेश खंडाळे, नवले महाराज आणि दादा मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टरांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना समाजातील आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने