मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पालघर जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 पालघर, दि. १४ एप्रिल २०२६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी बोलताना रानडे यांनी आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.


भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत झाली असून प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती यावर त्यांनी दिलेला भर आजही समाजाला प्रेरणा देणारा ठरत आहे.



कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) दिलीप पाडवी यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने