मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना संधी; पालघरमध्ये आमरण उपोषणाची हाक

स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना संधी; पालघरमध्ये आमरण उपोषणाची हाक

 


पालघर प्रतिनिधी 


पालघर जिल्ह्यातील मोरे कुरण परिसरात स्थानिक मराठी युवकांना रोजगारात डावलले जात असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. “मी स्थानिक, मी मराठी, मी महाराष्ट्रीयन” अशी ठाम भूमिका घेत स्थानिक हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेज प्रा. लि. कंपनीतील डीलरशिप व रोजगार प्रक्रियेत स्थानिक युवकांना दुय्यम वागणूक दिली जात असून, परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यामुळे परिसरातील युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.


“सहभागी व्हा… सहकार्य करा… आपल्या हक्कांसाठी…” असे आवाहन करत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मोरे कुरण, पालघर येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्थानिकांना न्याय मिळावा, रोजगारात प्राधान्य मिळावे आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.


दरम्यान, या आंदोलनाकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने