मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी युवासेनेत नव्या नेतृत्वाला संधी; कु. वृषभ मंगेश वारे यांची युवा विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती

युवासेनेत नव्या नेतृत्वाला संधी; कु. वृषभ मंगेश वारे यांची युवा विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती


 

पालघर प्रतिनिधी 


पालघर : शिवसेना 🏹 युवासेना 🚩 संघटनेत युवकांना नेतृत्वाच्या संधी देण्याच्या परंपरेला पुढे नेत कु. वृषभ मंगेश वारे यांची युवा विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवासैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि युवकांमध्ये सक्रिय संपर्क यामुळे वृषभ वारे यांनी अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे आवाज देण्यासाठी त्यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


युवासेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांना संघटनेशी जोडत विकासाभिमुख कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात विधानसभा क्षेत्रात संघटन विस्तार आणि युवकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते सक्रियपणे काम करतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक, युवासैनिक तसेच मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

💐 कु. वृषभ मंगेश वारे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने