मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर MIDC बोईसरमध्ये दुपारी थरारक घटना; गाळ्यांची तोडफोड, हल्ल्याचा प्रयत्न

पालघर MIDC बोईसरमध्ये दुपारी थरारक घटना; गाळ्यांची तोडफोड, हल्ल्याचा प्रयत्न

 

पालघर प्रतिनिधी 


पालघर : जिल्ह्यातील बोईसर MIDC परिसरातील पाम येथे आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली. कोर्टाचा निकाल लागलेल्या जागेवर 50 ते 100 जणांच्या जमावाने अचानक धडक देत जेसीबीच्या सहाय्याने गाळ्यांची तोडफोड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.



या गोंधळात उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या मुलावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, त्याला मारहाणही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी धारदार हत्यारे आढळून आली असून परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.


घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.


या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, जमाव इतक्या मोठ्या संख्येने कसा जमला आणि तोडफोडीमागे नेमका उद्देश काय होता, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.


या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून औद्योगिक क्षेत्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस तपासातून नेमके काय उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने