मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी RTE विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसुलीच्या तक्रारी; बहुजन विद्यार्थी संघटनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

RTE विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसुलीच्या तक्रारी; बहुजन विद्यार्थी संघटनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

 खालापूर | प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांकडून अतिरिक्त फी आकारली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी बहुजन विद्यार्थी संघटनेकडे केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज खालापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी दीपा गवस यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाकडे लक्ष वेधले.


यावेळी संघटनेच्या वतीने RTE अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हा त्यांचा कायदेशीर हक्क असून, कोणत्याही प्रकारे अतिरिक्त फी आकारणे हे नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अशा तक्रारींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली

.

गटशिक्षणाधिकारी दीपा गवस यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच RTE नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.


शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून आर्थिक कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पालकांच्या तक्रारींना न्याय मिळावा आणि RTE योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, अशी अपेक्षा बहुजन विद्यार्थी संघटनेने व्यक्त केली आहे.



जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने