मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबई येथे "मंत्रालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा" काढण्यात आला. विविध विद्यार्थी प्रश्न, शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा शांततेत आयोजित करण्यात आला होता.
मात्र, मंत्रालयाकडे निघालेल्या या मोर्चाला पोलिस प्रशासनाकडून बळजबरीने अडवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सरकारच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा रोखल्याचा गंभीर आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी "सरकार आम्हाला घाबरते, म्हणून पोलिसांना पुढे करते" अशी प्रतिक्रिया देत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांना दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
#मंत्रालयावर_विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #सम्यक_विद्यार्थी_आंदोलन #मुंबई #विद्यार्थी_आंदोलन #महाराष्ट्र #StudentProtest #MumbaiNews
