मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी डॉक्टर्स डे निमित्त हरिदया फाउंडेशनकडून १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; एकल महिलांसाठी आजीवन मोफत औषधोपचाराची घोषणा

डॉक्टर्स डे निमित्त हरिदया फाउंडेशनकडून १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; एकल महिलांसाठी आजीवन मोफत औषधोपचाराची घोषणा

 बोईसर | प्रतिनिधी

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने हरिदया फाउंडेशन (रजि.)च्या वतीने बोईसर येथील जिल्हा परिषद विद्यालय, वंजारवाडा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीतील १०० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.


विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, रबर, ड्रॉईंग बुक तसेच क्रेयॉन कलर्सचे संच वितरित करण्यात आले. यावेळी हरिदया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश हरिनाथ यादव यांनी एकल महिला व त्यांच्या कुटुंबीयांना आजीवन मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीर केला.


कार्यक्रमात बोईसर पूर्व भागातील ज्येष्ठ नागरिक दिलीप पाटील, जगदीश यादव, कुसुम पाटील आणि दशरथ संखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.



हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र वडे व शिक्षकवृंद यांच्यासह हरिदया फाउंडेशनचे विजय पाटील, रवींद्र यादव, मुकेश, शिवाजी आणि रामयश यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार फाउंडेशनने यावेळी व्यक्त केला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने