मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी सत्ता नसेल तर आंबेडकरवाद? : शरद पवारांच्या भूमिकेवरून नवा राजकीय वाद

सत्ता नसेल तर आंबेडकरवाद? : शरद पवारांच्या भूमिकेवरून नवा राजकीय वाद

 पुणे/अकोला प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख शरद पवार यांच्या भूमिकेवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे. “सत्ता मिळत नसेल तर आंबेडकरवादाचा आधार घ्यायचा” अशी टीका सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

विशेषतः पुण्यात भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. “एकीकडे भाजपविरोधी भूमिका, तर दुसरीकडे वंचितला हाताशी धरून राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर काही विचारवंत, लेखक आणि तथाकथित भडिमार बुद्धिजीवी शरद पवारांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहेत. मात्र याच गटाने लोकसभा निवडणुकीत “संविधान वाचवण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाला मतदान करा” असे आवाहन केल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“संविधान वाचवण्याची भाषा करणारे खरेच कोणाच्या बाजूने उभे आहेत? आणि हे सर्व कोणत्या राजकीय बिल्ल्याखाली लपून सुरू आहे?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद केवळ व्यक्ती किंवा पक्षापुरता मर्यादित नसून, आंबेडकरवादी विचारधारेच्या वापरावर आणि त्याच्या राजकीय सोयीस्कर अर्थ लावण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

दरम्यान, या संपूर्ण चर्चेवर शरद पवार किंवा संबंधित पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर मात्र हा मुद्दा वेगाने पसरत असून, येत्या काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.



जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने