मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पुण्यात कारमध्ये सापडली ५ लाखांची रोकड

पुण्यात कारमध्ये सापडली ५ लाखांची रोकड

भ्रष्टाचाराचा 'पंचनामा'! पुण्यात कारमध्ये सापडली ५ लाखांची रोकड आणि सरकारी फाईल्स; मोठी टोळी सक्रिय?


पुणे/मुंबई: एकीकडे पारदर्शक कारभाराचा दावा केला जात असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये एका खाजगी कारमध्ये जे काही सापडलंय, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका कारच्या झडतीमध्ये चक्क ५ लाख रुपयांची रोकड आणि चक्क भविष्यातील तारखा असलेल्या सरकारी फाईल्स सापडल्याने भ्रष्टाचाराचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


नेमकी घटना काय?

काही जागरूक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांनी संशयास्पद वाटणाऱ्या एका पांढऱ्या कारची झडती घेतली. यावेळी गाडीच्या टपावर सरकारी कागदपत्रांचा खच पडलेला होता. तपासणी केली असता, त्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची 'फायर एनओसी' (Fire NOC) आणि महत्त्वाची प्रमाणपत्रे सापडली. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही कागदपत्रांवर चक्क १९ जून २०२५ ची तारीख आहे!

गाडीत असलेल्या एका काळ्या पिशवीतून ५०० च्या नोटांची पुडकी जप्त करण्यात आली आहेत. सरकारी फाईल्स आणि लाखोंची रोकड एका खाजगी व्यक्तीच्या गाडीत काय करत होती? हा सवाल आता संपूर्ण राज्य विचारत आहे.

 विशेष रिपोर्ट:

सावन काशिनाथ ससाणे - महाराष्ट्र राज्य सचिव

 (RTI Human Rights Activist Association)

    मुंबई प्रदेश अध्यक्ष (जागरूक आवाज न्यूज)

 ससाणे यांचा प्रशासनाला थेट सवाल :

या घटनेवर बोलताना सावन ससाणे म्हणाले, "हा प्रकार म्हणजे उघडपणे चाललेली लूट आहे. सामान्य माणसाला कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात आणि दलालांच्या गाड्यांमध्ये सरकारी फाईल्स फिरतात, हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, 

        जागे व्हा, जनतेनो!

ही बातमी वाचून गप्प बसू नका. ही तुमच्या हक्काच्या पैशांची लूट आहे. हा व्हिडिओ आणि ही बातमी इतकी शेअर करा की प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल!


अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि अशाच सडेतोड बातम्यांसाठी 'जागरूक आवाज न्यूज'ला फॉलो करा.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने