मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर पूर्वेत विकासाला वेग; आंबेडकर नगर व भिमाई नगरमध्ये कामांचा शुभारंभ

पालघर पूर्वेत विकासाला वेग; आंबेडकर नगर व भिमाई नगरमध्ये कामांचा शुभारंभ

 पालघर प्रतिनिधी 


पालघर पूर्वेतील आंबेडकर नगर आणि भिमाई नगर परिसरात आज (२० मार्च २०२६) नागरी सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. आंबेडकर नगर येथे गटार बांधकाम तर भिमाई नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांना अखेर प्रतिसाद मिळाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.


या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नियोजन सभापती जस्विन घरत, नगरसेवक आनंद राऊत, नगरसेविका प्रिती मोरे तसेच सिकृत नगरसेवक बंड्या भाऊ म्हात्रे प्रमुख उपस्थित होते.


याशिवाय माजी नगरसेवक दिनेश घरत, राजेश गायकवाड, गावकरी सुरेश जाधव R P I जिल्हाध्यक्ष , छबीनदास गायकवाड, विक्रम गावंडे, वृषभ वारे, पिंटू जाधव आणि मोठ्या संख्येने गावकरी या सोहळ्याला उपस्थित राहिले

.

या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, आंबेडकर नगर परिसरात गटारींच्या अभावामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भिमाई नगरमध्ये पेव्हर ब्लॉक बसविल्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारून नागरिकांना अधिक सोयीस्कर वाहतूक सुविधा मिळणार आहेत.


दरम्यान, नागरिकांनीही या कामांबाबत समाधान व्यक्त केले असले, तरी कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विकासकामांचा खरा फायदा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि सतत देखरेख आवश्यक असल्याचे मत स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने