मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी एकतेचा संदेश देणारा नालासोपाऱ्यातील ‘ईद मिलन’ उपक्रम स्तुत्य

एकतेचा संदेश देणारा नालासोपाऱ्यातील ‘ईद मिलन’ उपक्रम स्तुत्य

 नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेला ‘शुभ ईद मिलन’ कार्यक्रम हा केवळ सणानिमित्ताचा औपचारिक समारंभ न ठरता, सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश देणारा ठरला आहे. गुरू सिद्धी, जीवदानी आणि साई श्रद्धा वेल्फेअर सोसायटीतील सर्वधर्मीय रहिवाशांनी एकत्र येत साजरा केलेला हा उपक्रम आजच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर आशादायी

 चित्र निर्माण करणारा आहे.

या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. समाजकारण आणि स्थानिक प्रश्नांबाबत जागरूक असलेले नेतृत्व अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होणे, हे सकारात्मक राजकारणाचे लक्षण मानावे लागेल.


महासचिव मा. मिलिंद कांबळे यांनी आपल्या भाषणातून “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हा मूलभूत विचार मांडत, सध्याच्या सामाजिक परिस्थितीत एकतेची गरज अधोरेखित केली. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून एकत्रितपणे भविष्य घडवण्याचे त्यांनी केलेले आवाहन हे केवळ शब्द न राहता कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे.



आजच्या काळात समाजात वाढत चाललेली दुरावा आणि मतभेद यावर उपाय म्हणून अशा प्रकारचे सर्वधर्मीय कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात. स्थानिक पातळीवर नागरिकांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.


या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यातील हा ‘ईद मिलन’ कार्यक्रम इतर भागांसाठी आदर्श ठरू शकतो. समाजात सौहार्द, संवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. आयोजकांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांनी दिलेला एकतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने