८ मार्च जागतिक महिला दिन हा केवळ औपचारिक शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रियांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची आठवण करून देणारा दिवस आहे. समाजात शिक्षण, समता, मानवता आणि सेवाभाव यांची मशाल प्रज्वलित करणाऱ्या महान महिलांच्या कार्याला “जागरूक महिला”च्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
इतिहास साक्षी आहे की, समाजात अज्ञान, अन्याय आणि भेदभावाच्या अंधारातही अनेक महिलांनी धैर्याने उभे राहून परिवर्तनाची क्रांती घडवली. शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांचा सन्मान, गरीब व वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. त्यांच्या त्याग, परिश्रम आणि दूरदृष्टीमुळेच आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.
आज महिला शिक्षण, प्रशासन, राजकारण, उद्योग, सामाजिक कार्य आणि मानवसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी महिलांवर अन्याय, अत्याचार आणि भेदभावाच्या घटना घडत असल्याची कटू वास्तवता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांच्या सन्मा
नासाठी आणि सुरक्षिततेसाठी समाजाने एकत्र येऊन ठोस भूमिका घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“जागरूक महिला”च्या माध्यमातून समाजात स्त्रीशक्तीचा सन्मान, समानता आणि स्वाभिमान यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महान महिलांच्या विचारातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या मूल्यांना जपावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिलांच्या संघर्ष आणि कर्तृत्वाला सलाम करत “जागरूक महिला” हा उपक्रम समाजात परिवर्तनाची नवी दिशा देईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
