पालघर : पालघर जिल्हा अंतर्गत सफाळा विभाग शाखेच्या वतीने कार्यकर्त्यांचे चिंतन शिबिर दत्ताराम गायकवाड गुरुजी यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाले. धम्माची जनजागृती, प्रचार-प्रसार आणि संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला सफाळा विभागातील १४ गावांतील धम्मबंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी धम्माचा प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी, समाजात बौद्ध विचारांचा प्रचार वाढवावा आणि संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहन केले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बुद्ध धम्माची चळवळ अधिक गतिमान करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला
.
दरम्यान, रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व कार्यकर्त्यांच्या एकमताने आणि पालघर जिल्हा शाखाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सफाळा विभाग शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे —
अध्यक्ष : आयु. दत्ताराम गायकवाड (जय भीम वाडी, विराथन खुर्द)
सरचिटणीस : आयु. प्रदीप जाधव (अंबोडे)
कोषाध्यक्ष : आयु. राहुल राऊत (विराथन खुर्द)
संस्कार उपाध्यक्ष : आयु. अनिल जाधव (अंबोडे)
सचिव : आयु. एकनाथ काळे (विराथन बुद्रुक)
प्रचार-पर्यटन उपाध्यक्ष : आयु. महेश शेलार (वेढी)
सचिव : आयु. उदय मोहिते (चटाले)
संरक्षण उपाध्यक्ष : आयु. परशुराम गायकवाड (विराथन खुर्द)
सचिव : आयु. नरेश गायकवाड (जय भीम वाडी, विराथन खुर्द)
कार्यालयीन सचिव : आयु. रुपेश जाधव (विराथन बुद्रुक)
महिला उपाध्यक्षा : आयुनी कीर्ती शेलार (वेढी)
सचिव : आयुनी नलिनी शेलार (वेढी)
नवीन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित धम्मबंधू-भगिनींनी मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
