राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात उत्साहाचे वातावरण
डहाणू प्रतिनिधी
डहाणू नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी मिहिरभाई शाह यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मिहिरभाई शाह यांच्या नियुक्तीमुळे डहाणू शहराच्या विकासाला नवी गती मिळेल आणि पक्षाची ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
मिहिरभाई शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू परिसरातील सामाजिक कार्यात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रभागी राहिले आहेत. स्थानिक विकासाच्या कामांचा त्यांना दांडगा अनुभव असून, त्यांच्या या अनुभवाचा उपयोग डहाणू शहराच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मिहिरभाई शाह यांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मिहिरभाई शाह यांच्यासारख्या अभ्यासू आणि कार्यक्षम व्यक्तीची निवड झाल्यामुळे डहाणू नगरपरिषदेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
Tags
राजकीय पक्ष
