मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी आंबेडकर पालघर माहिमआळी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

आंबेडकर पालघर माहिमआळी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा


 पालघर (प्रतिनिधी) : आंबेडकर पालघर माहिमआळी शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गावचे अध्यक्ष अक्षय गायकवाड, राष्ट्रीय पँथर आघाडी पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, राष्ट्रीय पँथर आघाडी संयोजक समिती सभासद निलेश गायकवाड तसेच बौद्ध युवक मंडळ माहीम कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून राष्ट्रगीत वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लहानग्यांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी शाळेला भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधान उद्देशिकेची प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

शाळेच्या शिक्षिका मेघा तांडेल व चिन्मयी दापोलीकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, हक्क व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करत, शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना बळकट होत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने