प्रतिनिधी पुणे
अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनीष जनार्दन लांजेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमास कामगार, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने लढत राहील, असे प्रतिपादन मनीष लांजेवार यांनी केले. तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी खेड तालुक्यासह परिसरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यालयामुळे माथाडी कामगारांच्या समस्या थेट मांडण्यासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
