मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेत नवी नियुक्ती

अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेत नवी नियुक्ती

 पालघर प्रतिनिधी 

पालघर जिल्हाध्यक्षपदी नितीन जाधव, महासचिवपदी नागसेन भाऊ गायकवाड

कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारी अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनीष लांजेवार यांनी पालघर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. त्यानुसार नितीन जाधव यांची पालघर जिल्हाध्यक्षपदी तर नागसेन भाऊ गायकवाड यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती संघटनेच्या विस्तार आणि संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. नितीन जाधव हे कामगार प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे, तळागाळातील कामगारांशी थेट संपर्क ठेवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तर नागसेन भाऊ गायकवाड यांनी संघटन कौशल्य, प्रशासनाशी समन्वय आणि आंदोलनात्मक अनुभवातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संस्थापक अध्यक्ष मनीष लांजेवार यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “पालघर जिल्ह्यात माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगारांच्या समस्या गंभीर आहेत. त्या सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. नितीन जाधव आणि नागसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास आहे.”

या नियुक्तीनंतर पालघर जिल्ह्यातील कामगारांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून, संघटनेच्या माध्यमातून वेतनवाढ, रोजगार सुरक्षा, सामाजिक न्याय आणि कायदेशीर हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. संघटनेची नवी टीम कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, आंदोलनात्मक तसेच चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.


जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने