पालघर तालुक्यातील माहीम आंबेडकर नगर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, देशभक्तीपर गाणी तसेच महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध उत्सव कमिटी, बुद्ध युवक मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले होते. सर्वांच्या एकजुटीमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडला. उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. राष्ट्रीय पँथर आघाडी पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, बौद्ध युवक मंडळ अध्यक्ष अक्षय गायकवाड, ज्येष्ठ नागरिक बाळकृष गायकवाड तसेच कार्यकर्ते संजय मोहिते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिवगर्जना देत महाराजांना अभिवादन केले.
राष्ट्रीय पँथर संयोजक समितीचे सभासद निलेश गायकवाड यांनी देशभक्तीपर आणि प्रेरणादायी गाणी सादर करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये तरुण पिढीचा मोठा सहभाग दिसून आला. निर्मिती गायकवाड, मंजिरी गायकवाड, जिज्ञा गायकवाड, तनिष्का मोहिते, पार्थ जाधव, दक्ष शेलार, दिशांत गायकवाड, स्वरा, द्रुवि, संतोष गायकवाड, मिहिर, यज्ञेश, राहुल, संदीप आणि कुशल यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
एकूणच, माहीम आंबेडकर नगर येथील शिवजयंती उत्सव हा सामाजिक एकता, तरुणांचा उत्साह आणि शिवचरित्रातून प्रेरणा घेणारा आदर्श असा ठरला.
