मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी प्रा. डॉ. प्रियदर्शनी ढोले यांचे मार्गदर्शन; बौद्ध महासभेची भव्य उपस्थिती

प्रा. डॉ. प्रियदर्शनी ढोले यांचे मार्गदर्शन; बौद्ध महासभेची भव्य उपस्थिती

 सफाळे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या उत्साहात उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रियदर्शनी ढोले (दांडेकर कॉलेज, पालघर) यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी भाषणातून सामाजिक एकात्मता, बौद्ध विचारसरणी आणि संघटनात्मक कार्याची दिशा स्पष्ट करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, सफाळे विभागाचे अध्यक्ष श्रीपाद शेलार होते. तसेच सोसायटीचे चेअरमन अरविंद दादा कवळी, माजी सरपंच राजेंद्र भोईर, ज्येष्ठ महिला भारती गायकवाड, अलका शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता सुतार, पोलीस पाटील वैभवी शेलार यांची विशेष उपस्थिती लाभली.


यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेश शेलार, सचिव राजेश राणे, कीर्ती शेलार, नलिनी शेलार, प्रमिला शेलार, मंडळाचे सदस्य नितीन शेष यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेची कमिटी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.



विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने