मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी माथाडी व ट्रान्सपोर्ट कामगार चळवळीला बळ; निलेश गावंडे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल – मनिष जनार्दन लांजेवार

माथाडी व ट्रान्सपोर्ट कामगार चळवळीला बळ; निलेश गावंडे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल – मनिष जनार्दन लांजेवार

 




महाराष्ट्रातील माथाडी व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कामगारांच्या संघटनात्मक चळवळीला नवे बळ देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून निलेश जी गावंडे यांची अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


निलेश गावंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सक्रियपणे कार्य करत असून माथाडी व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. संघटनात्मक कार्यातील त्यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि कामगारांप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष मनिष जनार्दन लांजेवार यांनी निलेश गावंडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेचे कार्य अधिक व्यापक होईल व राज्यातील कामगारांच्या हितासाठी प्रभावीपणे लढा उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निलेश गावंडे यांच्या या नियुक्तीमुळे राज्यभरातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने