महाराष्ट्रातील कामगार चळवळीत सक्रिय असलेले सदानंद जी गवई यांची अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना यांच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कामगार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सदानंद गवई हे अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असून संघटनात्मक कामकाजात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धती, नेतृत्वगुण आणि कामगारांप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल संस्थापक अध्यक्ष मनिष जनार्दन लांजेवार यांनी सदानंद गवई यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गवई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सदानंद गवई यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कामकाजाला नवे बळ मिळणार असून राज्यभरातील कामगारांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

