मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर पोलिसांची मोठी कारवाई : मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोरटा जेरबंद

पालघर पोलिसांची मोठी कारवाई : मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोरटा जेरबंद

 पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात घडलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पालघर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे.


२४ एप्रिल २०२६ रोजी बोईसर पूर्व येथील यदव नगर परिसरातून फिर्यादी यांच्या हिरो कंपनीची मोटार सायकल (MH-48/BY-4191) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा पालघर व बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी प्रदीप सोमण्णा बंजारी (वय ४८) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने मोटार सायकल चोरीची कबुली दिली.


पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपीवर पालघर, मीरा-भाईंदर, वसई-विरार व बृहन्मुंबई परिसरात चोरीचे तब्बल १६ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.ू


जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने