तलासरी प्रतिनिधी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी मुकेश धाकू नडगे (वय २३, रा. चिसाडा, मुरडोलपाडा, पो. मांदोणी, दादरा नगर हवेली) यांनी दुचाकी चोरी झाल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. हिरव्या-सफेद रंगाची स्कूटी क्रमांक DD-01 F-4144 ही तलासरी येथील स्टेट बँकेसमोरील पार्किंगमध्ये उभी केली असताना अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती.
या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अजय मनोहर मायावंशी (वय २६, रा. नारगोल, मायावंशी फलिया, ता. उमरगाव, जि. वलसाड, गुजरात) याचा शोध घेतला.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेली स्कूटी क्रमांक DD-01 F-4144 जप्त करण्यात आली आहे.
आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता ३ ऑक्टोबर २०२६ रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन आहाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव आणि तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
