मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी “सरपंचांच्या आशीर्वादाने अतिक्रमण? धनसार ग्रामपंचायतीत तीन मजली बेकायदेशीर इमारत उभी!”

“सरपंचांच्या आशीर्वादाने अतिक्रमण? धनसार ग्रामपंचायतीत तीन मजली बेकायदेशीर इमारत उभी!”

 धनसार ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर ३२ वरील अतिक्रमणाचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून ग्रामस्थांच्या चर्चेचा आणि तक्रारींचा विषय ठरत आहे. या प्रकरणात विद्यमान सरपंच राखी रवींद्र पाटील यांच्या कार्यकाळातच नियमबाह्य बांधकामाला मूक संमती दिल्याचा गंभीर आरोप होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित जागेवर कोणतीही वैधानिक परवानगी नसताना तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी अतिक्रमणावर कारवाई करणे अपेक्षित असताना, उलटपक्षी स्थानिक पातळीवर दुर्लक्ष आणि साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वे नंबर ३२ वरील अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई न होणे, हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, सामान्य नागरिकांनी किरकोळ बांधकाम केले तरी तत्काळ नोटिसा बजावल्या जातात; मात्र प्रभावशाली व्यक्तींच्या बाबतीत नियमांना बगल दिली जाते. ही दुहेरी भूमिका लोकशाही व्यवस्थेला आणि ग्रामपंचायतीच्या विश्वासार्हतेला तडा देणारी आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, तसेच जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा, “कायदा सर्वांसाठी समान” हा केवळ घोषवाक्यापुरताच मर्यादित राहील, अशी तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.



जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने