मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर नंडोरे नाका जवळ भिषन अपघात, दोन महिलांचा जागीच मृत्यू....

पालघर नंडोरे नाका जवळ भिषन अपघात, दोन महिलांचा जागीच मृत्यू....

 


पालघर प्रतिनिधी 


पालघर : शहराजवळील नंडोरे नाका परिसरात आज भीषण अपघात घडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेगाने येणाऱ्या वाहनाने महिलांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की लता निलेश तरे व बेबी चंद्रकांत जाधव या दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.



या प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण समोर येणे बाकी आहे.

दरम्यान, नागरिकांनी या परिसरात वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने