मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी शिवजयंतीनिमित्त नवली नाका परिसरात जल्लोषाचे वातावरण

शिवजयंतीनिमित्त नवली नाका परिसरात जल्लोषाचे वातावरण

 पालघर (प्रतिनिधी) : पालघर पूर्व नवली नाका येथे 19फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संजय कुरले व वाल्मीक प्रधान यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, नगरसेवक तसेच जेष्ठ कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संदेश दिला.


कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंती निमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक सलोखा, संघटनशक्ती आणि इतिहासाबद्दल अभिमान जागवणारा हा सोहळा ठरला


.

संजय कुरले व वाल्मीक प्रधान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले व भविष्यातही अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने