मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पंचाळी रमाईनगरमध्ये त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पंचाळी रमाईनगरमध्ये त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


 

पालघर प्रतिनिधी पंचाळी रमाईनगर परिसरात त्याग, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण परिसरात सामाजिक एकात्मता, विचारांची जागृती आणि आदरभाव यांचे दर्शन घडले.


दिवसभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या त्यागाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात दिलेल्या मोलाच्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. महिलांमध्ये स्वाभिमान, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणाऱ्या माता रमाबाई यांचे विचार आजच्या पिढीसाठीही तितकेच मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले

.

सायंकाळी या जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. पंचाळी रमाईनगर परिसरातून संपूर्ण गावात भव्य रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य आणि जयघोष करत नागरिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “माता रमाबाई आंबेडकर अमर रहें” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


ही जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि विचारांची मशाल पुढे नेणारी ठरली. पंचाळी रमाईनगरमधील हा सोहळा समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांची जपणूक करण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत तो वारसा पोहोचवण्याचा संदेश देऊन गेला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने