मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जेतवन बुद्ध विहाराच्या अध्यक्षांच्या वक्तव्याने हडपसरमध्ये खळबळ; विहारात लग्नासाठी पैशांचा प्रश्न ऐरणीवर

जेतवन बुद्ध विहाराच्या अध्यक्षांच्या वक्तव्याने हडपसरमध्ये खळबळ; विहारात लग्नासाठी पैशांचा प्रश्न ऐरणीवर

जेतवन बुद्ध विहाराच्या अध्यक्षांच्या वक्तव्याने हडपसरमध्ये खळबळ; विहारात लग्नासाठी पैशांचा प्रश्न ऐरणीवर


पुणे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद सरवदे 

पुणे (हडपसर) — पुणे शहरातील हडपसर परिसरात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दादा सरवदे आणि जेतवन बुद्ध विहार, पापडेवस्तीचे अध्यक्ष शिंदे सर यांच्यात झालेला संवाद सध्या समाजात तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे. विहारात लग्न लावून देण्यासाठी पैशांची अट घालण्यात येत असल्याचा मुद्दा या संवादातून समोर आला असून, त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

बौद्ध विहार हे समता, बंधुभाव आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनुसार समाजाने आडंबर आणि खर्चिक परंपरांना दूर ठेवून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु जर विहारातच विवाहासाठी आर्थिक अटी घातल्या जात असतील, तर हा प्रकार समाजाच्या मूलभूत मूल्यांनाच हरताळ फासणारा ठरतो.

संवादादरम्यान “पैसे असतील तर विहारात लग्न करा, नाहीतर करू नका” अशा आशयाचे वक्तव्य झाल्याची चर्चा आहे. अशा प्रकारची भाषा आणि भूमिका समाजासाठी अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. विहार हे समाजाचे सामूहिक धार्मिक व सामाजिक स्थळ आहे; ते कोणाच्याही खाजगी मालकीचे नसून सर्व समाजासाठी खुले असले पाहिजे.

निश्चितच विहाराचे व्यवस्थापन, देखभाल आणि कार्यक्रमांसाठी निधी लागतो, हे वास्तव आहे. मात्र त्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर आर्थिक दबाव टाकणे किंवा अटी लादणे योग्य ठरू शकत नाही. समाजातील गरीब आणि सामान्य कुटुंबांना विहारात सन्मानाने विवाह करण्याचा हक्क आहे, हे विसरून चालणार नाही.

मिलिंद दादा सरवदे आणि शिंदे सर यांच्यातील हा संवाद एक इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे. विहार व्यवस्थापन पारदर्शक असावे, देणगीची स्पष्ट पद्धत असावी आणि कोणत्याही प्रकारे समाजात भेदभाव किंवा आर्थिक अडथळे निर्माण होणार नाहीत याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची आहे.

आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. बौद्ध विहार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे केंद्र आहे; त्यामुळे तेथे समता, साधेपणा आणि समाजहित या मूल्यांना धक्का लागेल असे कोणतेही कृत्य समाज कदापि सहन करणार नाही.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने