मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी माहीम रोडवरील पानेरी येथे एसटी बस रस्त्याच्या कडेला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

माहीम रोडवरील पानेरी येथे एसटी बस रस्त्याच्या कडेला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला



 पालघर तालुक्यातील माहीम रोडवरील पानेरी परिसरात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डीहून सफाळे आगाराकडे येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची

 (एसटी) बस अचानक रस्त्याच्या कडेला गेल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बसवर पुन्हा नियंत्रण मिळविल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झालेली नाही.


बस चालकाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान अचानक एक मोटारसायकलस्वार समोर आल्याने त्याला क्षणभर काय करावे हे सुचले नाही. मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उतरली. मात्र चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत वाहनावर नियंत्रण मिळवून बस सुरक्षित थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवासी सुखरूप बचावले.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. नंतर परिस्थिती पूर्ववत करण्यात आली.


या घटनेमुळे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. तसेच रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर किती मोठे संकट ओढवू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून आली आहे.:::




जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने