मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


 पालघर जिल्हा प्रतिनिधी 

नवली, दि. १७ जुलै २०२६ : शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले.


हा उपक्रम सौ. दीपा पामाळे मॅडम यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा, आनंददायी आणि उज्ज्वल व्हावा, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. "ज्ञानाची वाट उजळण्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात वही!" हा संदेश यावेळी देण्यात आला.


कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री. दिनेश घरत, नगरसेवक श्री. आनंद राऊत तसेच नगरसेविका सौ. प्रीती मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.


यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण क्षेत्रात अशा लोकाभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, पालक, शिक्षक आणि उपस्थित नागरिक यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने