मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई

ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई

 🌸अभिनंदन साहेब, या पिढीचे सार्थक झाले🌸

      ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई


चे ट्रस्टी असल्याचे एकदाचा निकाल धर्मादाय आयुक्तांनी दिला आणि आंबेडकरी चळवळीच्या तिसऱ्या पिढीच्या जीवनाचे सार्थक झाले. हा निकाल यापेक्षा वेगळा लागला असता 

तर कदाचित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही आंबेडकरी समूहाच्या या पिढीच्याच काय; पण कधीच हाती लागली नसती. डॉ. एस. पी. गायकवाड आणि एम. एस. मोरे हे जुन्यांपैकी दोघेच 'शेड्युल्ड वन' ला असताना रामदास आठवलेंचे कार्यकर्ते 

हे दोघे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात जाताना दंडुके घेऊन त्यांच्या पाठीमागे लागायचे. त्यांच्या धाकाने एम. एस. मोरेंनी काही दिवस पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे दफ्तर आपल्या मुलीच्या फ्लॅटवर नेऊन ठेवले होते. शेवटी संरक्षणाची गरज म्हणून या दोघांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना ट्रस्टी म्हणून सोबत घेतले 

आणि डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना सेक्रेटरी दाखवून सोबत घेऊन फिरायचे; परंतु कायदेशीर बाबी मात्र मुद्दाम पूर्ण करायच्या नाही. दरम्यान एम. एस. मोरे मेले. त्यानंतर डॉ. एस. पी. गायकवाड आपल्या वकीला मार्फत, "मी पक्षाघातामुळे अंथरूनाला खिळून आहे, त्यामुळे मी तारखांना उपस्थित राहू शकत नाही." 

अशी रिपोर्टिंग मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयास करायचे. गेल्या शुक्रवार पर्यंत डॉ. एस. पी. गायकवाड यांनी अशी चालढकल केली; परंतु दोन दिवसांपूर्वी  केस बोर्डावर आली. ती ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या ट्रस्टी असण्यासंबंधी होती. डॉ. एस. पी. गायकवाडांनी अचानक 'यू टर्न' घेतला आणि,

 "मी या प्रकरणात रिपोर्टिंग ट्रस्टी नसून ऑब्जेक्टर आहे," असे आपल्या वकीला मार्फत लेखी कळवले. त्यांच्या या कृतीमुळे धर्मादाय आयुक्त सुद्धा आवाक झाले.शेवटी धर्मादाय आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन निकाल राखीव ठेवला आणि आज सोमवार दि. २० जुलै २०२६ रोजी निकाल दिला की,

 ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी आहेत. खऱ्या अर्थाने आता पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आंबेडकर कुटुंबाचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधील हुकूमशही व भ्रष्टाचार संपेल आणि आधुनिक भारताला नितांत आवश्यक असणारी नैतिक, बौद्धिक व सामाजिक लोकशाही प्रचलित करणारे शिक्षण पीपल्स एज्युकेशन सोसायटी देईल अशी आशा करायला आता बरीच  जागा झाली आहे. 

     श्रीपती सखुबाई लक्ष्मण ढोले

       शिक्षक/विद्यार्थी/ओएसडी

पीपल्स एज्युकेशन सोसायटी,मुंबई

मो. 9834875500

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने