मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ न्यायिक समता मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ न्यायिक समता मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

 *पालघर* : *प्रतिनिधी 


पालघर : न्यायिक समता मंच, पालघर जिल्ह्याच्या वतीने दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ पालघर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.


यावेळी पालघर जिल्ह्यातील अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बलप्रयोग झाल्याचा आरोप करत उपस्थितांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाही व्यवस्थेमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार


 संविधानाने दिलेला असून, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे योग्य न


सल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वेदनाद्वारे या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.



न्यायिक समता मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहणे ही शासनाची जबाबदारी असून, कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीऐवजी संवादातून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

या निवेदनाच्या वेळी न्यायिक समता मंचाचे पदाधिकारी, पालघर जिल्ह्यातील वकील उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने