मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर जिल्ह्यात पूरग्रस्त वाणगाव भागात हरिदया फाउंडेशनचा मदतीचा हात*

पालघर जिल्ह्यात पूरग्रस्त वाणगाव भागात हरिदया फाउंडेशनचा मदतीचा हात*

 *



पालघर, २७ जुलै २०२६: गेल्या काही दिवसांत पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. 


विशेषतः दहानू तालुक्यातील वाणगाव परिसरात मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला होता. 

अनेक घरांत पाणी घुसल्याने मुलांच्या शैक्षणिक साहित्य व घरातील रेशन पाण्यात वाहून गेले.


या संकटाच्या काळात हरिदया फाउंडेशन (रजि.) ने तात्काळ पुढे येत मदतकार्य सुरू केले. वाणगाव ग्रामपंचायत अंतर्गत *वाकीपाडा* गावात संस्थेने ५७ रेशन किट्स वाटप केल्या. प्रभावित कुटुंबांना कपडेही वितरित करण्यात आले.



मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. मुलांना अभ्यास चालू ठेवून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना चॉकलेट्स व बिस्किटे ही देण्यात आले.


*ग्रामस्थांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.*


त्याच ग्रामपंचायत अंतर्गत *ओहोळपाडा* येथेही ग्रामस्थांना कपडे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


या मदत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणगाव ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप वाघात यांनी अथक परिश्रम घेतले. 

कार्यक्रमात सरपंच श्रीमती सुनीता भांवर,ग्रामसेवक श्री. पिंपळे आणि कर्मचारी श्री. सुबोध,मराठे,अतुल व अल्पेश यांचा मोठा सहभाग होता.


हरिदया फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते श्री.विजय पाटील, श्री. रवींद्र,श्री.तितर मुखिया आणि श्री.शिवाजी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य यशस्वी केले.


हरिदया फाउंडेशन (रजि.) अशा संकटाच्या प्रसंगी समाजसेवेसाठी सदैव तयार असते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने