मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी नवली पालघर–पूर्व नवल नगरात खड्ड्यांचे साम्राज्य; नगरसेवक आणि पालिका प्रशासन झोपेत? नागरिकांचा संतप्त सवाल

नवली पालघर–पूर्व नवल नगरात खड्ड्यांचे साम्राज्य; नगरसेवक आणि पालिका प्रशासन झोपेत? नागरिकांचा संतप्त सवाल

 नवली–नवल नगरात खड्ड्यांचे साम्राज्य; नगरसेवक आणि पालिका प्रशासन झोपेत? नागरिकांचा संतप्त सवाल


!

पालघर : पालघर शहरातील नवली–नवल नगर परिसरात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, नवली तलाव ते आनंदी बस स्टॉप या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज खड्ड्यांच्या साम्राज्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी मुलांसह वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


वार्ड क्रमांक १४ मधील या गंभीर समस्येकडे पालघर नगरपरिषद आणि संबंधित नगरसेवकांचे लक्ष कधी जाणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी आणखी किती दिवस खड्ड्यांमधून प्रवास करायचा, असा सवालही आता पुढे येत आहे.


रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने