मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जिल्हा परिषद शाळांमधील गैरसोयीविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीची मोहीम सुरू

जिल्हा परिषद शाळांमधील गैरसोयीविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीची मोहीम सुरू


 माळेगाव, ता. कळमनुरी | प्रतिनिधी


कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीने विशेष पाहणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आली.


शाळेला भेट देऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाशी संबंधित अनेक समस्या निदर्शनास आल्याचे संघटनेने म्हटले आहे. पालकांनी शिक्षक नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह उपलब्ध असतानाही शाळेच्या प्रांगणात जेवण तयार केले जात असल्याचे, तसेच परिसरात कचरा व अस्वच्छता असल्याचे संघटनेने सांगितले. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यात गाळ व अस्वच्छता आढळल्याचा दावाही करण्यात आला आहे.


शाळेतील बाथरूमची दुरवस्था असून, पावसाळ्यात मैदानात गवत व झाडाझुडपे वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने नमूद केले.


या समस्यांबाबत तातडीने गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. संबंधित शाळेची पाहणी करण्यासाठी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.


विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर केवळ कागदोपत्री आश्वासन न देता प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळांमधील समस्यांचीही पाहणी करून ही मोहीम पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.


यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे, युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम, कार्यकर्ते राजे रणवीर, समाधान पाईकराव, माळेगाव शाखाध्यक्ष धम्मपाल पाईकराव, पप्पू पाईकराव, संतोष पाईकराव यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


मुख्य सवाल:

“इतर कामांसाठी पैसा उपलब्ध होतो; मग विद्यार्थ्यांच्या पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छ परिसर आणि शिक्षणासाठी आवश्यक सुविधांसाठी पैसा का नाही?”

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने