मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर पूर्वेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

पालघर पूर्वेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन



 पालघर : पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर पूर्व भागातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये माता रमाई चौक ते नवली-वेवूर मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील हा महत्त्वाचा रस्ता असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत (दलित वस्ती निधी) या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात होणारा चिखल, खड्डे तसेच वाहतुकीच्या अडचणींपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


या भूमिपूजन कार्यक्रमाला पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम भाऊ घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर वडे, शिवसेना पक्षाच्या गटनेत्या उज्ज्वला काळे, स्थानिक नगरसेवक आनंद राऊत व नगरसेविका प्रीती मोरे यांच्यासह पालघर नगर परिषदेतील विविध नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.


तसेच आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, माजी नगरसेवक राजेश गायकवाड छबीलदास गायकवाड आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्थेला याचा फायदा होणार आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने