मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा हेच आमचे ब्रीदवाक्य – डॉ. निलेश राऊत

गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा हेच आमचे ब्रीदवाक्य – डॉ. निलेश राऊत



 सफाळे (प्रतिनिधी) : गोरगरीब आणि गरजू जनतेला आरोग्यविषयक मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातत्याने कार्यरत असून, “गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा” हेच आमचे ब्रीदवाक्य असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख ॲड. डॉ. निलेश राऊत यांनी सांगितले.


विराथन बुद्रुक येथील राजनपाडा येथे श्री गणेश उत्सव मंडळाच्या वतीने, मित्र फाऊंडेशन पालघर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि वाडा येथील आयडियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राऊत बोलत होते.


शिबिरादरम्यान नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी करून गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.


श्री गणेश उत्सव मंडळाने यंदा २६ व्या वर्षात पदार्पण करताना लोकपयोगी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली. गतवर्षी मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तही आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.


यावेळी मित्र फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रदीप घरत, ज्येष्ठ पत्रकार हिरालाल लोखंडे, माजी सरपंच व मित्र फाऊंडेशनचे सदस्य जगदीश पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वसई तालुकाप्रमुख प्रथमेश बांदेकर, पालघर उपतालुकाप्रमुख दिपेश पाटील, मित्र फाऊंडेशनचे सदस्य शशी घरत, सचिन पाटील, आयडियल हॉस्पिटलचे शिबिरप्रमुख मोहित दीक्षित, जिजाऊ संस्थेचे तालुकाप्रमुख आदेश पाटील, अनिकेत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, पदाधिकारी नितीन पाटील, राजेश पाटील, प्रकाश पाटील, निलेश पाटील, चंद्रकांत भोईर, सचिन भोईर, रोहिदास भोईर, प्रशांत भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.



या आरोग्य शिबिराला ग्रामस्थ, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने