मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी स्मार्ट बाजारला कायद्याची भीती नाही का? पास्थळमध्ये रस्ता अडवून बेजबाबदार जाहिरातबाजी!"

स्मार्ट बाजारला कायद्याची भीती नाही का? पास्थळमध्ये रस्ता अडवून बेजबाबदार जाहिरातबाजी!"

तुमच्या एका चुकीच्या जाहिरातीमुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, याचे भान जाहिरातदारांना राहिले आहे का? बोईसरच्या पास्थळमध्ये आज असाच एक संतापजनक प्रकार घडला..."

बोईसर प्रतिनिधी अमोल काळे

पास्थळ येथील आंबट-गोड मैदानासमोर आज रोजी सायंकाळी 'स्मार्ट बाजार' या नामांकित कंपनीच्या जाहिरात वाहनाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अर्ध्या रस्त्यावर ठाण मांडले. सायंकाळी ७ वाजल्यापासून सुमारे तासभर एम.एच ०५ इ.एल ९५४९ क्रमांकाचे हे वाहन रस्त्यावर उभे होते, मात्र विशेष म्हणजे या ठिकाणी चालक किंवा कंपनीचे कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते. भर वर्दळीच्या वेळी हे वाहन 'बेवारस' स्थितीत सोडून दिल्याने वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‎औद्योगिक वसाहतीतील कामगार मोठ्या संख्येने सायंकाळी पास्थळ परिसरातून घरी परतत असतात. आंबट-गोड मैदानासमोरील रस्ता आधीच वर्दळीचा असताना, या जाहिरात व्हॅनने रस्त्याचा निम्मा भाग व्यापला होता. या वाहनावरील एलईडी स्क्रीनचा प्रकाश इतका प्रखर होता की, येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होत होते. जाहिरातीकडे लक्ष गेल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने तिथे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती.
‎प्रशासनाच्या परवानगीचा गैरवापर? सदर वाहनावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या परवानगीचा आधार घेऊन मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे वाहन उभे करण्याचा परवाना मिळतो का? असा सवाल उपस्थित झाला आहे. एम.एच०५ इ.एल ९५४९ या क्रमांकाच्या वाहनावरील आरटीओची परवानगी ही केवळ जाहिरात प्रदर्शनासाठी असताना, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे हा 'मोटार वाहन कायद्या'नुसार गुन्हा आहे.
‎चालकाचा पत्ता नाही: एकीकडे वाहनामुळे वाहतूक कोंडी होत असताना, त्याचे चालक किंवा संबंधित कर्मचारी परिसरात कोठेही आढळून आले नाहीत. सुमारे एक तास हे वाहन रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने लावून संबंधित कर्मचारी बेजबाबदारपणे निघून गेल्याचे दिसून आले.
‎या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित कंपनी आणि एम.एच ०५ इ.एल ९५४९ वाहनाच्या मालकावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पास्थळमधील रहिवासी आणि कामगारांनी केली आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने