वाशीम : अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना ही कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मनीष भाऊ लांजेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगेश अरुणराव मुद्दे यांची विदर्भ विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे विदर्भातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असून कामगारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आले असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मंगेश मुद्दे यांच्या नेतृत्वात विदर्भामध्ये अखिल भारतीय विकास माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना अधिक वेगाने विस्तारेल आणि ग्रामीण ते शहरी भागांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माननीय मनीष भाऊ लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असून विदर्भातील माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगारांना संघटनेच्या माध्यमातून एक सक्षम व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मंगेश मुद्दे यांच्या निवडीमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळाली असून आगामी काळात विदर्भात संघटना उंच भरारी घेईल, असा आशा केली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शुभेच्छुक गणेश अर्जुन धंद्रव्ये, जिल्हा सरचिटणीस वाशीम यांनीही मंगेश मुद्दे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
