मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी राष्ट्र सेवा दलाचा ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर

राष्ट्र सेवा दलाचा ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी 



पुणे | सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राष्ट्र सेवा दलाचा प्रतिष्ठेचा ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ यंदा डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना जाहीर करण्यात आला. या सन्मानामुळे सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या माध्यमातून देशभर संविधानिक मूल्यांचा प्रसार, सामाजिक सलोखा, समता आणि बंधुतेचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्र सेवा दलाने हा पुरस्कार प्रदान केला. विविध समाजघटकांमध्ये संवाद आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात आले.


गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या ‘पुनर्गठन दिन’ मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान केवळ माझा नसून समता, सामाजिक न्याय आणि बंधुतेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.” त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरी चळवळीतील सहकाऱ्यांचे आभार मानले.


समाजात समता आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचा सन्मान प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने